PM किसान: 20 व्या हप्त्याची तारीख निश्चित? ₹2000 थेट खात्यात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जून 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏
10
Join WhatsApp Group

20 वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता. योजनेच्या नियमांनुसार, दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. त्यानुसार, 20 वा हप्ता जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 20 जून 2025 रोजी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र सध्या तरी अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तरीही, शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे, कारण लवकरच ही रक्कम जमा होऊ शकते.

आपले नाव लाभार्थी यादीत कसे तपासाल?

शेतकरी आपल्या हप्त्याची स्थिती आणि लाभार्थी यादीतील आपले नाव pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात. यासाठी 'Farmers Corner' मधील 'Beneficiary Status' पर्यायावर क्लिक करून आपला आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून माहिती मिळवता येते.

eKYC अनिवार्य:

२० व्या हप्ता साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे eKYC प्रक्रिया पूर्ण करणे. सरकारी सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. जर तुमचा eKYC पूर्ण झाला नाही तर तो पुढील आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खरे शेतकरी लाभार्थी आणि कृत्रिम लाभार्थी यांच्यात फरक करता येईल.

Leave a Comment