लगेच चेक करा! घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर; उशीर झाला तर नाव कट होणार

महाराष्ट्र राज्यातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेची नवीन लाभार्थी यादी (२०२५-२६) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, ते आता घरबसल्या आपल्या मोबाईलवर आपले नाव तपासू शकतात.

घरकुल योजना म्हणजे काय?

ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने सरकार विविध घरकुल योजना राबवते. यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश होतो:

  • प्रधानमंत्री आवास योजना (PMAY): केंद्र पुरस्कृत योजना.
  • रमाई आवास योजना: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी.
  • शबरी आवास योजना: अनुसूचित जमाती (आदिवासी) बांधवांसाठी.
  • मोदी आवास योजना: इतर मागासवर्गीय (OBC) लाभार्थ्यांसाठी.

घरकुल योजनेसाठी मिळणारे अनुदान

सावधान! आधार कार्ड बंद होण्यापूर्वी मोबाईलवर करा ‘हे’ काम; पाहा नवीन सोपी पद्धत!

मंजूर लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:

  • साधारण क्षेत्र: १.२० लाख रुपये.
  • डोंगाळ/नक्षलग्रस्त क्षेत्र: १.३० लाख रुपये.
  • इतर लाभ: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी १२,००० रुपये आणि मनरेगा अंतर्गत मजुरीचे पैसे स्वतंत्रपणे दिले जातात.

अर्ज कसा करावा?

  • 📌ऑनलाईन पद्धत:
  • https://pmayg.nic.in या संकेतस्थळावर लॉगिन करून ‘Beneficiary Registration’ पर्याय निवडा. आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
  • 📌ऑफलाईन पद्धत:
  • ग्रामपंचायत कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज भरून द्यावा.

घरकुल यादीत नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाचे कागदपत्रे (जर तुमचे नाव यादीत नसेल तर)

जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • उत्पन्नाचा दाखला
  • ७/१२ उतारा किंवा जागेचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो

टीप: जर तुम्हाला ऑनलाईन यादी पाहण्यास अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवकांशी संपर्क साधू शकता. तिथेही नवीन ‘ड’ यादी उपलब्ध असते.

Leave a Comment