nrega job card : नमस्कार. मित्रांनो तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे काय माहित आहे का? याची फायदे माहित आहेत का? हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत जॉब कार्ड ही योजना आली. ही योजना अनेक जणांना माहित नाहीये त्यामुळे अजूनही काही लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये.जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला तुमच्या पंचायत स्तरावर रोजगार मिळवायचा असेल व त्यातून पैसे कमवायचे असतील तर हे कार्ड तुम्हाला उपयोगात येणार आहे.

job card apply : हे कार्ड जर आपल्याकडे असेल. तर आपल्याला रोजगार मिळायला मदत होते व त्या रोजगारातून आपण आपले घर भागवू शकतो. हे जॉब कार्ड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत बनवलेले आहे या कार्ड अंतर्गत प्रौढ सदस्यांना अनुकूल वेतन करण्यास इच्छुक असलेल्या 100 दिवसांचा रोजगार मिळाला जातो. या योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांसाठी व त्या काम करण्यासाठी या कार्डचा उपयोग होतो.
जॉब कार्ड मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी तुम्ही खाली पाहू शकता
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- आधार कार्डची छायाप्रत.
- बँक पासबुकची छायाप्रत.
- आधार कार्ड नसताना शिधापत्रिकेची छायाप्रत.
- मतदार ओळखपत्र.
जॉब कार्डसाठी अर्ज कसा करावा?
- प्रथम जॉब कार्ड अर्ज साध्या कागदात किंवा विहित नमुन्यात भरा.
- फॉर्ममध्ये अर्जदाराचे नाव आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती द्या.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि तळाशी तुमची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा ठेवा.
- आता अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती संलग्न करा.
- तयार केलेले जॉब कार्ड तुमच्या पंचायत कार्यालयात मिळवण्यासाठी अर्ज सबमिट करा.
- स्क्रीनिंग कमिटी तुमच्या अर्जाची छाननी करेल. अर्ज योग्य आढळल्यास आणि कागदपत्रे पूर्ण असल्यास, तुम्हाला ३० दिवसांत जॉब कार्ड मिळेल.